top of page
Minimalistic work place

उद्बोधक लेख

Credit Card : मोठ्या खरेदी साठी EMI चा पर्याय निवडताना या गोष्टी माहित करून घ्या !!

आजकाल सगळेच जण सरासपणे क्रेडिट कार्ड वापरताना दिसतात. क्रेडिट कार्ड वापरून लहान-मोठी खरेदी ही केली जाते. अनेक बँकांद्वारे क्रेडिट कार्डच्या वापर केल्यावर विविध आकर्षक ऑफर आणि डिस्काउंट दिला जातो त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना याचा फायदा होतो. (credit card EMI conversion information in Marathi)

आज आपण या लेखामधून क्रेडिट कार्ड ची खरेदी आणि त्याचे हप्ते याबद्दल माहिती करून घेऊया.

  • क्रेडिट कार्डवर मोठी खरेदी करण्याचे प्रमाण बरेच दिसून येते त्यामागचं महत्त्वाचं आणि उपयोगी असं कारण म्हणजे केलेल्या खरेदीचे हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सोय. अर्थातच हे एक प्रकारचे लोन च आहे.

  • हप्त्यांमध्ये व्यवहाराचे पैसे भरल्यामुळे निश्चितच मोठी खरेदी करून सुद्धा अतिरिक्त आर्थिक भार येत नाही.

  • क्रेडिट कार्ड वापरणे हा एक सोयीस्कर पर्याय असला तरी पैसे वेळेवर म्हणजे दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे योग्य ठरते.

  • मुदतीच्या आधी पैसे भरल्यास दंड म्हणून अतिरिक्त व्याजाचे पैसे भरावे लागत नाही .

  • मात्र EMI चे पैसे मुदतीच्या आधी भरले नाही तर त्यासाठी व्याजासकट पैसे भरावे लागतात.

  • EMI साठी कालावधी व्याजाची रक्कम आणि व्याजदर याचे गणित लक्षात घेऊन ठरवावा.

  • सगळेच व्यवहार किंवा काही निवडक व्यवहार तुम्ही EMI मध्ये रूपांतरित करू शकता यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन तसे सूचित करावे लागते किंवा ऑनलाईन मध्ये पर्याय निवडावा लागतो.

  • व्याजदर आणि इतर शुल्क : (interest rate and other fees)

  • व्यवहार करताना EMI चा पर्याय निवडल्यास प्रत्येक वेळी व्याजदर तपासा.

  • प्रत्येक व्यवहार ज्या प्रमाणे वेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनी आणि व्याज दराचे नियम वेगळे असू शकतात.

  • व्याजदर वार्षिक असून 12.5% ते 36% पर्यंत असतो. .

  • बऱ्याच वेळेस EMI चा पर्यायासाठी प्रक्रिया शुल्क ही भरावे लागते, साधारण व्यवहाराच्या मूळ रकमेवर 1 % ते 3% शुल्क असते.

  • मुदतीपूर्व सर्व पैसे भरायचे असल्यास कार्ड धारकाला 3% पर्यंत शुल्क भरावे लागते.

लेखकः श्री निलेश तावडे.


खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नोंदवा. त्यामुळे पुढील विषयावर लिहिण्याचे बळ मिळते.

40 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page